हडपसर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

‘रस्ता बंद’ आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे – हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी येथील नाशिक-पुणे महामार्गावर २८ जून या दिवशी शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले. महाराष्ट्रातील नारायणगाव, आळेफाटा, नवले पूल, पुणे, हडपसर, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, किवळे, कराड पुणे-बेंगळूरू हायवे, कोपरगाव, जुन्नर आदी ठिकाणी आंदोलकांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.