सीबीआय किंवा एस्.आय.टी. नेमा ! – डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वाहिनी

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टमधील गंभीर लाडू घोटाळ्याप्रकरणी चौकशीची मागणी !

श्री. सुरेश चव्हाणके

नवी देहली – तिरुमला तिरुपती देवस्थान न्यासामध्ये झालेल्या धार्मिक नियमांचे उल्लंघन झाले आहे. पवित्र प्रसादम् सिद्ध करण्यासाठी गैर-शाकाहारी पदार्थ वापरल्याचा आरोप आहे. यात गोमांस चरबी, डुक्कर चरबी आणि माशांचे तेल यांचा समावेश आहे. हे मंदिर हिंदु धर्मियांसाठी अत्यंत पूजनीय आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की, लाडू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सीबीआय (केंद्रीय अन्वेषण पथक) किंवा एस्.आय.टी. (विशेष तपास पथक) नेमण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकाराची सखोल आणि कडक कारवाई करावी अन् चौकशी करावी. तिरुपती मंदिरातील धार्मिक नियम (‘प्रोटोकॉल’)  कडकपणे लागू केले जावेत’, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

हिंदु परंपरांच्या रक्षणासाठी सदैव लढा देत रहाणारे डॉ. चव्हाणके यांनी म्हटले आहे की, जगातील हिंदूंच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या या मंदिरात लाखो भक्त मंदिरात येऊन पवित्र प्रसादम् घेतात. तो भगवान व्यंकटेश्वर यांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. वरील प्रकार हा धार्मिक पवित्रतेचा गंभीर भंग आहे. त्यामुळे लाखो हिंदु भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तिरुमला तिरुपती मंदिरातील प्रसादम शुद्ध, शाकाहारी असावा आणि अशा प्रकारच्या धार्मिक नियमांच्या उल्लंघनाला थारा नसावा. यामुळे भक्तांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसला असून असे प्रकार इतरत्रही घडू शकतात. या प्रकारामुळे धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करणार्‍या घटनेतील कलमाचा भंग झाला आहे. प्रसाद हे धार्मिक परंपरेचे मुख्य अंग असल्याने प्रसादात गैर शाकाहारी घटकांचा समावेश हा भक्तांच्या भावना आणि धार्मिक अधिकार यांचा अपमान आहे.

संपादकीय भूमिका 

प्रसादात गैर शाकाहारी घटकांचा समावेश केल्याने झालेल्या अवमानाच्या विरोधात हिंदूंनीही एक होऊन आवाज उठवावा !