Dharwad : धारवाड (कर्नाटक) येथे धार्मिक स्थानावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद

झाडाखाली ठेवलेले महबूब सुभानी दर्ग्याचे दगड

धारवाड (कर्नाटक) – धारवाडमधील सुपर मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून झाडाखाली हनुमान, करियम्मा आणि नागदेवता यांची पूजा केली जात होती; मात्र आता शेजारील झाडाखाली महबूब सुभानी दर्ग्याचे दगड ठेवले गेले आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी आले आणि दोन्ही समाजांच्या देवतांचे स्थान काढून टाकणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय घडणार ?