सर्वांनी शांतता राखावी ! – हरियाणातील नूंह येथील हिंसाचारावर अमेरिकेची प्रतिक्रिया

हरियाणामधील नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, आम्हाला याविषयी ठाऊक नव्हते.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यात वाढत्या अपघाताला अनुसरून ‘सरकार अपघात टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करणार ?’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असून हे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ५ व्या क्रमांकावर आहे.

समृद्धी महामार्गावर १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याची व्यवस्था करणार ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम विभाग

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०९ अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधातील कायदा व्हावा ! – प्रवीण दरेकर, गटनेते, भाजप

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदु मुलींना बळजोरीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अनधिकृत धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे.

देवस्थानच्या व्यवहारासंबंधी माहिती न देणार्‍या २ अधिकार्‍यांना गोवा माहिती आयोगाकडून दंड

एखादी खासगी संस्था सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली येत असेल, तर त्या संस्थेची माहिती ही सार्वजनिक ठरते. या तरतुदीनुसार मामलेदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांवर ही माहिती देणे बंधनकारक ठरते.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवामुळे संतप्त शेतकरी १० ऑगस्टला आंदोलन करणार !

शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे त्याचे दृश्य परिणाम अद्याप दिसत नसून हत्तींकडून हानी करणे चालूच आहे. हत्तींचा उपद्रव थांबवू न शकणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून बेपत्ता झालेल्या ८२९ महिला आणि मुले यांपैकी ६९५ जणांचा शोध लागला !

‘रिव्होल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी पोलीस दलातील ‘पिंक फोर्स’संबंधी (महिला पोलिसांच्या दलासंबंधी) विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

‘म्हादई’चे पाणी वळवण्याचे प्रकरण आणि ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ घोषित करणे, ही सूत्रे एकमेकांना जोडू नका ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

म्हादई अभयारण्य ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्यास म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवता येणार नसल्याचा विरोधी गटातील सदस्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे आवाहन केले.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

तरी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करा, या मागणीचे मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेले निवेदन कोल्‍हापूर निवासी उपजिल्‍हाधिकारी तेली यांना देण्‍यात आले.