हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या पुणे येथील प्राध्‍यापकाचे निलंबन ! 

‘मुसलमान आणि ख्रिस्‍ती धर्मात केवळ एकच देव असल्‍याने, बुडणार्‍या नावेतून वाचवण्‍यासाठी त्‍यांचे नाव घेताच ते साहाय्‍यासाठी आले. हिंदू मात्र श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा विविध देवांना साहाय्‍यासाठी बोलावत राहिले; मात्र हिंदु धर्मात असंख्‍य देवता असूनही साहाय्‍यासाठी कुणी आले नाही’, असे म्‍हणत त्‍यांनी हिंदु धर्मातील देवतांची, हिंदूंच्‍या श्रद्धेची खिल्ली उडवली आहे.

सातारा जिल्‍हा परिषदेतील सुरक्षारक्षकाला मारहाण !

सातारा जिल्‍हा परिषद येथे राजकीय कार्यकर्त्‍यांची गुंडगिरी वाढत असून २ ऑगस्‍ट या दिवशी एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. जिल्‍हा परिषद परिसरात वाहन लावण्‍यावरून हा प्रकार घडला. 

नगरसुल रेल्वेस्थानकात महत्त्वाच्‍या रेल्‍वे गाड्यांना थांबा मिळावा !

हे निवेदन त्‍यांनी अन्‍न  पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्‍वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्‍य राज्यमंत्री भारती पवार  नगरसुल रेल्वे स्टेशन मास्तर गौतम आहेरे, रेल्‍वे सदस्य समीर समदडिया यांना निवेदन दिले आहे.

विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

मणीपूरच्‍या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.

हिंदु राष्‍ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्‍यासह ६ जणांना अटक !

भूमी नावावर करून देण्‍यास नकार दिल्‍याने एका शेतकर्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी हिंदु राष्‍ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्‍यासह ६ जणांना अटक करण्‍यात आली आहे. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून या प्रकरणी प्रदीप बलकवडे यांनी तक्रार दिली आहे.

नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची राज्‍यशासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्‍ट या दिवशी विधानसभेत केली. 

प्रदीप कुरुलकर यांच्‍यावर देशद्रोहाचा खटला चालवावा ! – जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष

काही दिवसांपूर्वी पुणे येथे ‘डी.आर्.डी.ओ.’चे उच्‍च पदस्‍थ अधिकारी प्रदीप कुरुलकर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली; मात्र त्‍यांच्‍यावर ‘ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्‍ट’ अंतर्गत खटला चालू आहे; मात्र हा खटला देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्यांतर्गत का चालवला गेला नाही ?, असा प्रश्‍न राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांनी ३ ऑगस्‍टला विधानसभेत उपस्‍थित केला.

ज्ञानतपस्‍वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्‍कार घोषित !

११ डिसेंबर २०२२ या दिवशी भोज येथे झालेल्‍या तिसर्‍या कन्‍नड साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषवले आहेत. तसेच करवीरपिठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्‍या शुभहस्‍ते त्‍यांचा सत्‍कार झाला आहे.

‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

चेन्‍नई येथे भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

उपस्‍थित मान्‍यवरांनी उत्‍सुकतेने विषय समजून घेतला आणि शंकानिरसन करून घेत प्रत्‍यक्ष कृती करण्‍याचा निर्धार केला. तसेच स्‍वतःला समजलेली साधना इतरांनाही सांगणार असल्‍याचे उपस्‍थित कार्यकर्त्‍यांनी सांगितले.