२ सहस्र ३७८ खड्डे बुजवले ! – एम्.एम्.आर्.डी.ए.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्.एम्.आर्.डी.ए.) मुंबई आणि उपनगरांतील रस्‍त्‍यांवरील २ सहस्र ३७८ खड्डे बुजवल्‍याचे सांगितले आहे. मेट्रो, तसेच अन्‍य प्रकल्‍प यांच्‍या कामामुळे रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाली होती.

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये प्रचंड झुरळे !

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये इतक्‍या प्रचंड प्रमाणात झुरळे झाली होती की, प्रवाशांनी ‘पेस्‍ट कंट्रोल’ केल्‍याविना गाडी पुढे जाऊ देणार नाही’, अशी कठोर भूमिका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणार्‍या धर्मांधाला अहिल्‍यानगर येथे अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी अरमान शेख याने ५ ऑगस्‍ट या दिवशी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते ‘रेकॉर्ड’ केले. सदरची क्‍लिप प्रसारित होताच शेखला एका व्‍यक्‍तीने याविषयी भ्रमणभाष केल्‍यावर पुन्‍हा शेखने आक्षेपार्ह भाषेत वक्‍तव्‍य करून हिंदु समाजाच्‍या भावना दुखावल्‍या.

गिधाड दिसल्‍यास संपर्क करा ! – नागपूर वनविभाग

अत्‍यंत धोकादायक समजले जाणारे ‘लाँग बिल्‍ड व्‍हल्‍चर’ या जातीचे गिधाड येथे आढळले आहे. शहरात अशी आणखी काही गिधाडे असण्‍याची शक्‍यता असल्‍याने ती दिसल्‍यास ०७१२-२५२५३०६ या क्रमांकावर तातडीने संपर्क करण्‍यास वनविभागाने सांगितले आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुणे येथील आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास !

भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्‍वेस्‍थानकांचा पुनर्विकास करण्‍याचे घोषित केले आहे.

नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

मुरूम उत्‍खननाविषयी पाचपट दंड आणि स्‍वामित्‍व धन जागाभाडे मिळून १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड अल्‍प करण्‍यासाठी, तसेच स्‍थळ निरीक्षणासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना येथील तहसीलादर नरेशकुमार बहिरम यांना अटक केली.

दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत पोलिसांनी कसायांना साहाय्‍य केल्‍याचा गोरक्षकांचा आरोप !

खाटीक गल्ली येथील इदगाह मैदानाच्‍या मागे १ जर्सी गाय आणि वासरू हत्‍येसाठी आणले आहे, अशी माहिती ३ ऑगस्‍टला रात्री गोरक्षादल, महाराष्‍ट्र राज्‍याचे गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली.

मुंबई लोकलमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार असल्‍याची धमकी देणारा अटकेत !

मुंबई लोकलमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट करण्‍यात येणार असल्‍याची धमकी देणारा भ्रमणभाष मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षाला आला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका व्‍यक्‍तीने लोकलमध्‍ये बाँब ठेवल्‍याचे म्‍हटले.

‘अमृत भारत स्‍थानक योजने’त महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश !

देशातील रेल्‍वेस्‍थानकांच्‍या आधुनिकीकरणासाठी राबवण्‍यात येणार्‍या ‘अमृत भारत योजने’चा ६ ऑगस्‍ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते शुभारंभ झाला. या योजनेत महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश आहे.

बदलापूर ते बारवी रस्‍त्‍यावरील खड्डे कि खड्ड्यात रस्‍ता ?

बदलापूर ते बारवी या २३ किलोमीटर अंतरापर्यंतचे खड्डे बुजवण्‍यासाठी महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) कोट्यवधी रुपये खर्च केले; पण यंदा पुन्‍हा तेेथे मोठमोठे खड्डे पडले.