महाराष्ट्रात ‘एंटेरो कॉक्ससॅकी’ विषाणूमुळे ५ लाखांहून अधिक लोक डोळ्यांच्या साथीने ग्रस्त !

राज्यात डोळ्यांची साथ ‘एंटेरो फॅमिलीतील कॉक्ससॅकी’ या विषाणूमुळे आली आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे झपाट्याने डोळ्यांच्या साथीचा संसर्ग होऊन रुग्णसंख्या ५ लाखांहून अधिक झाली आहे. ‘कॉक्ससॅकी’ विषाणू धोकादायक नसला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे.

भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक कह्यात ! 

गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणे, व्यवस्थापक नेमणे आणि लेखापरीक्षण करणे यांसाठी भाईंदर येथील उपिनबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक शेख अली हैदर दगडू मिया (वय ३५ वर्षे) याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

राज्यातील सर्व विद्यापिठांच्या अभ्यासक्रमात समानता राखण्यासाठी समितीचे गठण !

राज्यातील सर्व विद्यापिठांच्या अभ्यासक्रमात समानता रहावी, यासाठी राज्यशासनाने २९ ऑगस्टला राज्यातील विद्यापिठांच्या कुलगुरूंची समन्वय समिती गठीत केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्यापिठांचा अभ्यासक्रम सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही समिती समन्वय ठेवणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली.

भिवंडी येथे सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार !

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

हिंदु महिलेची फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने हिंदु महिलांना धर्मशिक्षण देण्याची , तर धर्मांधांवर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे !

खामगाव (बुलढाणा) येथे गणेशोत्सवकाळात ‘डीजे’ वाजवण्यास अनुमती नाही !

उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.

(म्हणे) ‘देवाचा फोन आल्यावर निवडणुकीत किती जागा मिळतील ? हे सांगू !’ – फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

देवाशी बोलण्यासाठी भक्त व्हावे लागते. देवाविषयी विनोदबुद्धीने बोलणारे अब्दुल्ला स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

पू. कालिचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पू. कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्र-चकती पोलिसांनी पडताळून पाहिल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

अहिल्यानगर येथे नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात अहिदूंंना ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये !

अहिंदूंंना सामुग्री अथवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे मंदिर प्रशासनाकडे केली आहे.