पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसचा निर्धार मोर्चा !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्‍या हत्‍येला २० ऑगस्‍ट या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. त्‍या निमित्त पुण्‍यात स्‍मृती जागर, मूक मोर्चा आणि विवेकी निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

२७ लाखांची ठेव बुडण्‍याच्‍या धास्‍तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्‍यू !

काही दिवसांपूर्वी आदर्श नागरी सहकारी पतसंस्‍थेतील अपव्‍यवहार समोर आला असून २०० कोटी रुपयांहून हा अधिकचा आकडा आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

(म्‍हणे) ‘ब्राह्मण समाजातील लोक त्‍यांच्‍या मुलांची नावे संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत !’ – छगन भुजबळ, अन्‍न आणि नागरी पुरवठा मंत्री

समाजातील ब्राह्मण वर्गाविषयी समाजात द्वेष निर्माण करण्‍याच्‍या आणि त्‍याला वाळीत टाकण्‍याच्‍या हिंदुद्वेषींनी रचलेल्‍या व्‍यापक षड्‍यंत्राचाच भुजबळ एक भाग आहेत, हे लक्षात येते.

मिरज येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्‍साहात पार पडले !

येणार्‍या आपत्‍काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्‍ध न झाल्‍यास उपचार करण्‍यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्‍यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्‍यात आले.

(म्‍हणे) ‘फाळणीच्‍या रक्‍तपाताचा इतिहास शाळेत शिकवायला नको !

जर्मनीमध्‍ये अडॉल्‍फ हिटलरचा इतिहास शिकवला जातो. तो कुणीही नाकारत नाही. त्‍यामुळे फाळणीचा इतिहास भारतातील मुलांना का शिकवू नये ? मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठीच अशी विधाने केली जातात, हे लक्षात घ्‍या !

धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे युवक अन् त्‍याला पाठीशी घालणारे नगरसेवक फिरोज पठाण यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

शहरातील मुसलमान युवक अरमान शेख याने १५ ऑगस्‍ट या दिवशी इंस्‍टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि अश्‍लाघ्‍य लिखाण केले, तसेच शत्रूराष्‍ट्र पाकिस्‍तानचे उदात्तीकरण करत सामाजिक अन् जातीय तेढ निर्माण केली.

मुंबईत साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिनी ‘वॉल मॅग्‍झिन’वर वाचकांनी नोंदवले अभिप्राय !

‘सनातन प्रभात’ ‘घरोघरी ‘सनातन प्रभात’ असायला हवा’, ‘वृत्तपत्र नव्‍हे, सर्वांचा परममित्र’, ‘सनातन प्रभातमुळे मुलांवर धर्मसंस्‍कार, धर्माचरण यांचे संस्‍कार झाले’, ‘अतिशय छान’, ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचे ध्‍येय’, ‘भक्‍त आणि भगवंत यांमधील दूत’ अशा शब्‍दांत वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी अभिप्राय नोंदवला.

छत्रपती संभाजीनगर येथे मंदिरातून घराकडे जाणार्‍या ४ वर्षीय बालिकेवर अत्‍याचार !

मंदिरातून घराकडे निघालेल्‍या ४ वर्षीय बालिकेवर अत्‍याचार करण्‍यात आला. वाळूजजवळील पंढरपूर येथे रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज एम्.आय.डी.सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून पोलिसांनी अवघ्‍या १ घंट्यात आरोपी संभाजी धवारे (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे.

राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! – अधिवक्‍ता समीर पटवर्धन

सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून तो भगवंताशी जोडलेला जीव आहे. राष्‍ट्र-धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे सनातन प्रभात होय, असे प्रतिपादन अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी केले.