मुख्‍यमंत्र्यांच्‍या भेटीनंतर ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला १२ घंट्यांत प्रारंभ !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्री परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाला अचानक भेट दिली. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी रुग्‍णालयातील ६ विभाग दुरुस्‍त करण्‍याची सूचना केली होती. त्‍यांच्‍या सूचनेनंतर १२ घंट्यांत या सर्व विभागांच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

विधान परिषदेच्‍या उपसभापतींच्‍या बैठकीला गणेशोत्‍सव मंडळे अनुपस्‍थित !

आगामी गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी बोलवलेल्‍या बैठकीकडे पुणे शहरातील गणेशोत्‍सव मंडळांनी पाठ फिरवली.

नाशिक येथे आजपासून कांदा लिलाव चालू होणार !

कांद्यावर निर्यात शुल्‍क लावल्‍याप्रकरणी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्‍या उपस्‍थितीत येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात २३ ऑगस्‍ट या दिवशी व्‍यापारी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्‍मक तोडगा निघाला असून २४ ऑगस्‍टपासून कांद्याचे लिलाव चालू होणार आहेत.

शासकीय रुग्णालयांत रुग्णाची फसवणूक करून उपचारांसाठी पैसे घेतल्यास कठोर कारवाई होणार !

शासकीय रुग्णालयांत आरोग्य पडताळणी आणि उपचार करतांना जनतेची दिशाभूल किंवा फसवणूक करून रुग्णांकडून शुल्क घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी,असा आदेश राज्यशासनाने दिला

बहुपत्नीत्व हे इस्लाममध्ये धार्मिक कृत्य !

धर्माच्या नावाखाली देशाच्या हिताच्या आड येणार्‍या लोकप्रतिनिधींना आता जनतेने घरीच बसवले पाहिजे !

भारत जगात सर्वाधिक गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ! – पंतप्रधान मोदी

वैश्‍विक अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर असतांना ‘ब्रिक्स’ देशांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. अशातच भारत सर्वाधिक गतीने वृद्धींगत होणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.

(म्‍हणे) ‘चंद्रयान मोहीम पूजा, तंत्र, होम हवनमुळे नाही, तर अचूक तंत्रज्ञानामुळे यशस्‍वी होईल!’

चंद्रयान-३ मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी कोट्यवधी भारतीय नागरिकांनी प्रार्थना केली, तसेच जगभरातील अनेक देशांनी चंद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त आवश्यक !

अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ शिरस्त्राण (हेल्मेट) न घातल्याने होत असल्याचे दिसून येते.

हिंदूंच्या हिताचे निर्णय घेणारे राज्यकर्ते हवेत ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीचे होणारे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरील मार्गदर्शनासंबंधी माहिती दिली.

जोधपूर न्यायालयाने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका स्वीकारली !

‘आश्रम’ या वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्ध याचिका जोधपूर न्यायालयाने स्वीकारली आहे. अधिवक्ता खांडेलवाल यांनी ३ वर्षांपासून याविषयी न्यायालयीन लढा दिला.