मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर !

शिवतीर्थावर (पोवई नाक्‍यावर) पू. गुरुजींच्‍या समर्थनार्थ आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत पू. गुरुजींच्‍या प्रतिमेला दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. नंतर जिल्‍हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्‍यात आले.

आळंदीच्‍या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्‍यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, सभापती, विधान परिषद

येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्‍याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्‍य सरकारने चालू केले पाहिजे.

कांदिवली येथे दूषित पाणीपुरवठा !

येथील काही परिसरांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागांत पाण्‍यातून सूक्ष्म रेती येत आहे. यामुळे पोट बिघडणे, उलट्या, जुलाब होणे असे त्रास रहिवाशांना होत आहेत. याविषयी अभियंत्यांना कळवले असल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले आहे. 

विद्यार्थ्‍यांवर घराच्‍या ओट्यावर बसून शिकण्‍याची वेळ !

विक्रमगड तालुक्‍यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्‍हा परिषदेच्‍या इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्‍या शाळेत ८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे; मात्र शाळेची एक इमारत कोसळली असल्‍याने विद्यार्थ्‍यांना एका घराच्‍या ओट्यावर बसून शिकावे लागत आहे.

पुण्‍यात आतंकवाद्यांना आश्रय देणारा कादीर पठाण आहे ‘तबलिगी जमात’चा कार्यकर्ता !

आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्‍यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्‍याचे अन्‍वेषणात निष्‍पन्‍न !

दगडूशेठ गणपतीसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.

अकोला येथे कूलरचा झटका बसून दांपत्‍याचा मृत्‍यू !

घरामधील कूलरला स्‍पर्श केल्‍यावर विजेचा झटका बसून प्रभाकर जानोरकार (वय ७० वर्षे) आणि त्‍यांची सौ. पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (वय ६५ वर्षे) यांचा मृत्‍यू झाला. 

ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.