मुंबई येथील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई येथील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये रहाणार्‍या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणार्‍या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत दिली. 

मुंबईतील मौलाना आझाद रस्त्यावरील इमारतीमधील २८ रहिवाशांना सदनिका कधी मिळणार ? – भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा प्रश्न

ज्या कारणास्तव त्यांच्या सदनिका अडकल्या आहेत, त्याविषयी शासनाचे स्टेटस काय ?, असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन करणे अयोग्य ! – आमदार बच्चू कडू

‘ऑनलाईन गेमिंग’मुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. ‘भारतरत्न’ मिळालेल्या व्यक्तीने (सचिन तेंडुलकर यांनी) अशा प्रकारे ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन करणे अयोग्य आहे, असे मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत व्यक्त केले. अंतिम आठवडा चर्चेच्या वेळेत ४ ऑगस्ट या दिवशी त्यांनी सभागृहात हे सूत्र उपस्थित केले. 

‘महाडीबीटी’द्वारे मिळणारा लाभ नाकारण्यासाठी २ मासांत व्यवस्था उपलब्ध करून देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

राज्यशासनाच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या वतीने अनुदानाचे थेट हस्तांतर करण्यात येते; मात्र एकदा मिळालेले अनुदान परत करण्यासंदर्भात व्यवस्था उपलब्ध नाही.

शिरोली (कोल्हापूर) येथे हिंदु फळविक्रेत्यास धर्मांध मुसलमानांकडून मारहाण  !

शिरोली फाट्यावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या एका हिंदु फळविक्रेत्यास ३ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता धर्मांध मुसलमानांनी बेदम मारहाण केली. ‘तू बाहेरून आला आहेस. तुला मारून टाकतो’, अशी धमकी त्यांनी हिंदु विक्रेत्यास दिली.

कराड येथील गोरक्षण संस्थेवरील नगर परिषदेचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित !

येथील भाजी-मंडईमध्ये असणार्‍या गोरक्षण केंद्राच्या भूखंडावर कराड नगर परिषदेने ‘शॉपिंग सेंटर, मार्केट आणि पार्किंग’ असे आरक्षण टाकलेले होते. सदरचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित करण्यात आल्यामुळे …

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस (जिल्हा सांगली) येथे मोर्चा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पलूस बसस्थानकापासून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थावर समाप्त झाला.

पू. भिडेगुरुजींची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करण्याची समर्थकांची पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ ५ ऑगस्ट या दिवशी बालगंधर्व चौकामध्ये दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; परंतु पोलिसांनी अमित शाह यांच्या दौर्‍याचे कारण देत ही अनुमती नाकारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ

येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ झाला आहे. लवकरच संग्रहालयाच्या अंतर्गत फर्निचरचे काम पूर्ण होऊन संग्रहालय प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. 

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे काम ९० टक्के पूर्ण ! – आमदार नितेश राणे, भाजप  

राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची आमची सिद्धता असून ते काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.