गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात धाडी : तिघेजण कह्यात !

‘पी.एफ्.आय.’(पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया) या आतंकवादी संघटनेच्‍या  संपर्कात असल्‍याच्‍या संशयावरून राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कोल्‍हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे धाडी घातल्‍या.

आज मिरज येथे स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या काव्‍यावर आधारित कार्यक्रम ! 

सांगली जिल्‍ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि ‘नृत्‍यश्री चॅरिटेबल फाऊंडेशन’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने १५ ऑगस्‍टला सायंकाळी ५.३० वाजता स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या मराठी अन् हिंदी भाषेतील काव्‍यांवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट (ट्‍वीट) केले की, हा दिवस त्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करण्‍यासाठी आहे, ज्‍यांचे जीवन देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी बळी गेले. हा दिवस त्‍या लोकांचे कष्‍ट आणि संघर्ष यांचेही स्‍मरण करवतो, ज्‍यांना विस्‍थापनाचा दंश झेलण्‍यास बाध्‍य व्‍हावे लागले होते. अशा सर्व लोकांना माझे शत शत नमन !

नवी मुंबईत भ्रमणभाषची चोरी करणार्या ३ आरोपींना अटक !

एका नागरिकाच्या भ्रमणभाषची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आरोपीविरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही ! – नातेवाईकांचा आरोप

महिला कर्मचार्‍यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. स्नेहा थडाणी यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.    

झोपेचे सोंग घेऊन पतीकडून पत्नीचे शेजारच्या युवकाशी असलेले अनैतिक संबंध उघड !

पतीने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे.

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.