५० ‘मायक्रॉन’हून अल्‍प जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास मुंबईत ५ सहस्र रुपये दंड !

मुंबई महानगरपालिकेने शहरात २१ ऑगस्‍टपासून प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवर बंदीचा आदेश लागू केला आहे. यामध्‍ये ५० ‘मायक्रॉन’पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात येणार आहे.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्‍या जामीन अर्जावर म्‍हणणे मांडण्‍याचा न्‍यायालयाचा आदेश !

संशोधन आणि विकासाचा संस्‍थेचे संचालक आणि वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी न्‍यायालयात जामिनासाठी केलेल्‍या अर्जावर सरकारी पक्षाने २५ ऑगस्‍ट या दिवशी उत्तर द्यावे, असा आदेश दिला आहे.

शक्‍ती आणि बालकल्‍याण पुरस्‍कारांसाठी ३१ ऑगस्‍टपर्यंत अर्ज करण्‍याची मुदत !

केंद्रशासनाच्‍या महिला आणि बाल विकास विभागाकडून देशातील शौर्यवान आणि खिळाडू वृत्तीच्‍या बालकांचा ‘शक्‍ती’ आणि ‘बालकल्‍याण’ पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात येतो. या पुरस्‍कारासाठी केंद्रशासनाकडून अर्ज मागवण्‍यात आले आहेत.

हिंदु आणि मुसलमान समाजातील ३५ जणांवरील दंगलीचे गुन्‍हे रहित !

शेलगाव येथे २९ मे २०२३ या दिवशी विवाह समारंभासाठी विविध गावांमधून नागरिक जमा झाले होते. डीजे लावून नवरदेवाची वरात काढत असतांना वरात मशिदीसमोर आल्‍यावर नावेद पटेल याने डीजे बंद करण्‍यास सांगितला.

पुणे शहरातील ५० गुन्‍हेगारी टोळ्‍यांवर ‘मकोका’अंतर्गत २९७ जणांना अटक !

गुन्‍हेगारांवर कायमची जरब बसवण्‍यासाठी कायद्याची कठोरपणे कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. त्‍यातूनच गुन्‍हेगारांच्‍या मनात पोलिसांविषयी धाक निर्माण होईल !

हिंदु धर्मानुसार आचरण केल्‍यावर एकही मुलगी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसणार नाही ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या लव्‍ह जिहादच्‍या आणि महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला वयोमर्यादाही राहिलेली नाही. अगदी लहान मुलींपासून ते ७० वर्षांच्‍या वयस्‍कर महिलेवरही अत्‍याचार झाल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत.

शेतकर्‍यांच्‍या लाभासाठीच कांद्याच्‍या निर्यातीवर शुल्‍क लावण्‍याचा घेतला निर्णय ! – भारती पवार, केंद्रीय राज्‍यमंत्री

कांदा निर्यातीवर ४० टक्‍के शुल्‍क लावल्‍याने शेतकर्‍यांमध्‍ये प्रचंड संताप आहे. केंद्र सरकारच्‍या या निर्णयाला विरोध म्‍हणून शहरातील सर्व बाजार समित्‍यांमधील कांदा लिलाव शेतकर्‍यांनी बंद पाडले आहेत.

रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्‍यपाल रमेश बैस

या वेळी एकनाथ शिंदे यांनी ‘गरजवंताच्‍या साहाय्‍यासाठी देव नेहमी धावतो. टाटा म्‍हणजे अढळ विश्‍वास, गुणवत्तेची निश्‍चिती आणि सामाजिकतेचे प्रचंड भान आहे’, अशा शब्‍दांत रतन टाटा यांचे कौतुक केले.

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सरकारमुक्‍त होण्‍याविषयी मुंबई न्‍यायालयाने राज्‍य सरकारचे म्‍हणणे मागवले !

सर्वत्रची मंदिरे सरकारच्‍या कह्यातून मुक्‍त होण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्‍यक !

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे प्रवरा नदीत पशूवधगृहातील रक्‍तमिश्रीत पाणी सोडल्‍याविषयी ११ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी उपोषण करावे लागणे लज्‍जास्‍पद !