
कोल्हापूर – अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्याला जो मजकूर वाचण्यास सांगितला तो अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकातील आहे. असे असतांना यावर जाणीवपूर्वक राजकारण करून काँग्रेस, डावे, पुरोगामी हे अकारण ऋषितुल्य अशा पू. भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करून अश्लाघ्य शब्दात त्यांच्यावर टीका करत आहेत. तरी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, श्री. विजय गुळवे, कोल्हापूर जिल्हा बजरंग दल संयोजक श्री. पराग फडणीस, श्री. अक्षय ओतारी, श्री. प्रथमेश मोरे, विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. कुंदन पाटील, सहमंत्री श्री. अनिल दिंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री. राजू तोरस्कर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांसह धारकरी, तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तक्रार
कोल्हापूर – पू. भिडेगुरुजी यांच्यावर खोटे आरोप करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार यशोमती ठाकूर, आमदार छगन भुजबळ यांच्यावर कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. या वेळी धारकरी, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !