केरळ विधानसभेचे अध्‍यक्ष ए.एन्. शमसीर यांचा वाशी येथे निदर्शनांद्वारे निषेध !

हिंदूंनो, हिंदु धर्माची विटंबना करणार्‍यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा चालूच ठेवा !

कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर लिहिली जाणार आरोग्याला हानीकारक असल्याची चेतावणी

जर ‘लोकांनी सिगारेट ओढू नये’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तिच्या उत्पादन आणि विक्री यांवरच बंदी घातली पाहिजे !

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून निषेध !

हिंदूंच्‍या धार्मिक यात्रेवर जिहादी मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत आणि देशात जातीय दंगे भडकवण्‍याचा कट आहे. तरी मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवून दोषींना तात्‍काळ शासन करण्‍यात यावे.

रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आघाडीच्या खासदारांनी येत्या रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटण्यास सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

पू. भिडेगुरुजींच्‍या व्‍याख्‍यानाचे फलक आणि भगवे ध्‍वज यांची समाजकंटकांकडून हानी !

कार्यक्रम प्रारंभ होण्‍याच्‍या काही घंट्यांपूर्वी काही समाजकंटकांनी ते फलक फाडून भगव्‍या ध्‍वजांना क्षतिग्रस्‍त केले. या संदर्भात हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्‍याविषयी निवेदन दिले.

राजस्थानमधील काँग्रेसचे निलंबित मंत्री राजेंद्र गुढा यांनी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती केली सार्वजनिक !

काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरणच असल्याने जेथे त्याचे सरकार आहे, तेथे भ्रष्टाचार झाला नाही, तर ती बातमी होईल !

आमदार यशोमती ठाकूर, पृथ्‍वीराज चव्‍हाण, जितेंद्र आव्‍हाड यांना निलंबित करा !

पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्‍यघटनेचा अपमान करणे, राज्‍यामध्‍ये शांतता-सुव्‍यवस्‍था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्‍यत्‍व कायमस्‍वरूपी निलंबित करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

चेंबूर येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात बुरख्यावर बंदी !

येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

नूंह येथील धर्मांधांच्या हिंसाचाराच्या प्रकरणी ११६ जणांना अटक

नूंह येथील धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ गुन्हे नोंदवून ११६ जणांना अटक केली आहे.

डॉ. आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्‍याचा प्रस्‍ताव विचाराधीन ! – शंभूराज देसाई, मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण या संस्‍थेतील (‘बार्टी’) या संस्‍थेकडून इयत्ता १० वीमध्‍ये ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्‍या ३६ जिल्‍ह्यांतील पहिल्‍या ३ मुली आणि ३ मुले यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्‍य देण्‍याचा प्रस्‍ताव शासनाच्‍या विचाराधीन आहे.