पुणे येथील ‘पाषाण-बाणेर लिंक’ रस्‍त्‍यासाठी सक्‍तीने भूसंपादनाचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे महापालिकेला आदेश !

रहिवाशांना ३० वर्षे त्रास सहन करावा लावणारे संवेदनाशून्‍य महापालिका प्रशासन कधीतरी जनहित साधू शकेल का ? शेवटी न्‍यायालयालाच आदेश द्यावा लागतो, तर प्रशासनाचा एवढा मोठा डोलारा हवा कशाला ?

समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी पैशांच्‍या मागणीचा आरोप !

समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी प्रत्‍येकाकडून ४० लाख रुपये घेतले जातात. समाजकल्‍याण विभागाच्‍या एका महिला उपायुक्‍तांचे याविषयीचे १५ मिनिटांचे ध्‍वनीमुद्रण उपलब्‍ध असून त्‍यामध्‍ये मुख्‍यमंत्र्यांचेही नाव आहे.

कळवा येथे वृक्ष उन्‍मळून पडल्‍याने २ जण घायाळ !

या घटनेमुळे शहरातील वृक्षांचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. घायाळांना उपचारांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्राचे नायक छत्रपती शिवाजी महाराजच ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कोविड काळात भ्रष्‍टाचार करणार्‍यांना सोडणार नाही. ऑक्सिजन प्‍लांट कालबाह्य झालेले वापरण्‍यात आले, हा अहवाल आहे. ‘डेड बॅग’मध्‍ये (मृतदेहांसाठी वापरण्‍यात येणारी बॅग) घोटाळा करण्‍यात आला.

कोपरखैरणे येथे महारक्‍तदान आणि महाआरोग्‍य तपासणी शिबिराला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

लायन्‍स क्‍लब ऑफ न्‍यू बाँबे, तुर्भे यांच्‍या वतीने नेत्रचिकित्‍सा आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. ज्‍या व्‍यक्‍तींना मोतिबिंदू झाल्‍याचे तपासणीमध्‍ये निदान झाले

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

हिंदु विद्यार्थ्‍यांना शाळा-महाविद्यालयांत धर्मपालन करण्‍यापासून रोखू नये !

वास्‍तविक शाळा-महाविद्यालय येथे विद्यालयाचा पोषाख घालणे आवश्‍यक आहे. असे असतांना तेथे बुरखा, हिजाबला अनुमती देण्‍यात येते. ज्‍यांना धार्मिक वेशभूषा करायची असेल, त्‍यांनी ती शाळेबाहेर करावी.

‘जय श्रीराम’ लिहिल्‍याने ख्रिस्‍ती शाळेतील शिक्षकाची हिंदु विद्यार्थ्‍यास मारहाण

ख्रिस्‍ती शाळा वारंवार हिंदु विद्यार्थ्‍यांची गळपेची करतात, यावर सरकार कोणती कठोर कारवाई करणार ?

कोकण रेल्वेमार्गावर ८ ऑगस्ट या दिवशी ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

जिल्ह्यातील संगमेश्वर रोड ते रत्नागिरी या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी मंगळवार, ८ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत मेगाब्लॉक (अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे.

मोहरमनिमित्त प्रीतीसंगम उद्यानात मंदिराच्‍या परिसरात मांसाहारी जेवण करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

प्रीतीसंगम उद्यानात मांसाहार जेवण करण्‍यास बंदी आहे, तसेच या परिसरात हिंदूंंची अनेक मंदिरे असूनही या ठिकाणी मांसाहार जेवण करण्‍यात आल्‍याने हिंदु समाजाच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत.