पलानी मुरुगन मंदिरात ‘बिगर हिंदूंना अनुमती नाही’, असे दर्शवणारे फलक पुन्हा लावा !

मद्रास उच्च न्यायालयाने ‘पलानी मुरुगन स्वामी मंदिरात मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशावर बंदी’, असे नमूद करणारे फलक पुन्हा लावण्याचा आदेश दिला आहे.

ओडिशामध्ये माओवाद्यांच्या तळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त !

राज्यातील मलकानगिरी वनक्षेत्रात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. कैमेला भागातील माओवाद्यांच्या तळाविषयी सीमा सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.

आडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे वाटप न झाल्यास आंदोलन करणार ! – राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, सिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीतीलभूखंडांच्या वाटपाविषयी १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी भाजपचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

गोवा : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रहित करण्यासाठी विरोधकांचा सरकारवर दबाव

क्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकरणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम चालू आहे. सरकारने हा प्रकल्प रहित करावा.

चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकत असल्याचे उघड : अपघाताचे गोवा विधानसभेत पडसाद

या भीषण अपघाताच्या प्रकरणी संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे वाहन हाकणे, वैयक्तिक आणि दुसर्‍याची सुरक्षितता धोक्यात आणणे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

सत्र न्यायालयाने चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला !

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

गुन्हेगारी‍वर आळा घालण्यासाठी साधना अपरिहार्य !

‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(म्‍हणे) ‘भगवान परशुराम ही एक दंतकथा !’ – केरळचे माकपचे नेते पी. जयराजन् यांचे हिंदुद्रोही वक्‍तव्‍य

हिंदूंच्‍या देवतांवर खालच्‍या स्‍तराला जाऊन टीका करणारे साम्‍यवादी कधी ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांच्‍या श्रद्धास्‍थानांवर टीका करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !