कोची (केरळ) – केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमसीर यांनी ‘श्री गणेश ही एक दंतकथा आहे’, असे सांगत श्री गणेशाचा अवमान केला होता. आता केरळमधील माकपचे नेते पी. जयराजन् यांनी भगवान परशुरामाचा अवमान केला आहे. कासारगोड येथे भाषण करतांना जयरामन् म्हणाले, ‘‘भगवान परशुराम ही एक दंतकथा आहे. केरळच्या उत्पत्तीची कथा (केरळची उत्पत्ती भगवान परशुरामाने केली) ही लोकांना गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी रचली.’’ (ब्राह्मणद्वेष नसानसांत भरलेले साम्यवादी ! – संपादक) केरळच्या सत्ताधारी पक्षाचे सर्वोच्च नेते राजकीय अपलाभ उठवण्यासाठी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सतत अपमान करत आहेत.
A few days back the speaker of the Kerala Legislative Assembly Sri. Shamseer insulted Lord Ganesha by calling him a myth. Today another senior @CPIMKerala leader Sri. P. Jayarajan insults Lord Parashuram by talking on very similar lines.
It’s very disappointing and shocking to… https://t.co/AnLHIBIXCC— Anil K Antony (@anilkantony) August 6, 2023
या सर्वांनी त्यांच्या या अवमानकारक विधानांविषयी बिनशर्त क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव अनिल के. अँटनी यांनी ट्वीट करून केली आहे. देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अँटनी यांनी केरळमधील पिनराई विजयन सरकारवर टीका केली.
हिंदूंच्या देवतांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करणारे साम्यवादी कधी ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या श्रद्धास्थानांवर टीका करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |