हुब्बळ्ळी – उडुपी येथील एका महाविद्यालयातील प्रसाधनगृहात हिंदु विद्यार्थिनींची छायाचित्रे काढल्याचे प्रकरण ताजे असतांना आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. हुब्बळ्ळी येथील एका महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचे ‘इन्स्टाग्राम’खाते ‘हॅक करून’ त्या खात्यावरून अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर ती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहेत.
Hubballi college student posts vulgar content, challenges police#newskarnataka #Karnatakanews #karnataka #hubballi #college #students #police https://t.co/VzHc57LNLj
— News Karnataka (@Newskarnataka) August 5, 2023
१. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची इन्स्टाग्राम खाती ‘हॅक’ करून संबंधित विद्यार्थिनींच्या छायाचित्रांना अश्लील पद्धतीने छेडछाड करून ती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात येत आहेत.
२. हे प्रकरण उघडकीस येताच पोलीस आयुक्तांनी महाविद्यालयांना भेट देऊन चौकशीला प्रारंभ केला आहे. काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या कार्यकारी मंडळाकडे तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
Karnataka: College Student Shares Vulgar Posts on Hindu Girls in Hubballi, Challenges Police To Nab Him; Manhunt Launched#karnatakapolice #CollegeStudent #Hubballi #HinduGirls #VulgarPostshttps://t.co/PEQoJEcbh6
— LatestLY (@latestly) August 4, 2023
३. हिंदु विद्यार्थिनींची फसवणूक करणार्या टोळीने ‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’, अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.