‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !

या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

‘चंद्रयान-३’चा ‘अवतरक’ (लँडर) यानापासून यशस्वीपणे विभक्त !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.

पोलीस अन्वेषण योग्य दिशेने होत असून न्याययंत्रणेवर विश्वास ठेवा ! – ‘स्वराज्य गोमंतक’चे आवाहन

म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर असे आवाहन केले.

धार्मिक स्थळाचा वापर २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करू नये ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

चिखली चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो वास्को येथे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना हे आवाहन केले.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यदिनाची सुटी असूनही नळयोजनेतील बिघाड दुरुस्त करण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा पुढाकार

ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, कर्मचारी वर्ग यांनी त्यांना मोलाची साथ देत पाण्याच्या पंपाचा बिघाड दुपारपर्यंत दूर केला. स्वातंत्र्यदिनाची सुटी असतांनाही खंडित पाणीपुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांचे मन जिंकत शासकीय कर्मचार्‍यांनी विश्वासार्हता कायम राखली !

चावडी, काणकोण (गोवा) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला मद्यालयाच्या मालकाचा विरोध

शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्‍या अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व !

‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

सुधारित कायद्यांमुळे गुन्‍हे सिद्ध होण्‍याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

ब्रिटीशकालीन कायदे भारतियांना दाबून ठेवण्‍यासाठी करण्‍यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्यांमध्‍ये लोकशाहीनुरूप पालट केला आहे. त्‍यामुळे हे कायदे नवीन आव्‍हानांना सामोरे जाण्‍यास सिद्ध करतील.