केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

मुंबई – राज्‍याला उद्योग क्षेत्रामध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर नेण्‍यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्‍य सरकार समन्‍वयाने काम करत आहे. त्‍यामुळे केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘शेतकर्‍यांसाठी आम्‍ही केवळ १ रुपयात ‘पीक विमा’ योजना चालू केली. ही एक ऐतिहासिक योजना असून त्‍यातून पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना त्‍याचा लाभ होत आहे.’’