सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘काही पंथांत असते त्याप्रमाणे हिंदु धर्मात धर्मप्रसार करून निवळ स्वतःच्या धर्मियांची वा अनुयायांची संख्या वाढवण्याला महत्त्व नाही. याउलट हिंदु धर्मात धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे. याचा अर्थ आहे, ‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले