सुधारित कायद्यांमुळे गुन्‍हे सिद्ध होण्‍याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – ब्रिटीशकालीन कायदे भारतियांना दाबून ठेवण्‍यासाठी करण्‍यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्यांमध्‍ये लोकशाहीनुरूप पालट केला आहे. त्‍यामुळे हे कायदे नवीन आव्‍हानांना सामोरे जाण्‍यास सिद्ध करतील. पूर्वीच्‍या कायद्यांमुळे देशातील न्‍यायव्‍यवस्‍थेमध्‍ये वेळकाढूपणा होता. त्‍यामुळे तारखेवर तारीख मिळत होती; परंतु न्‍याय मिळत नव्‍हता. कायद्यातील सुधारणांमुळे गुन्‍हे सिद्ध होण्‍याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊ, असा विश्‍वास राज्‍याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना व्‍यक्‍त केला.