चंद्राच्या दिशेने आगेकूच !
बेंगळुरू (कर्नाटक) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले. या माध्यमातून चंद्रयान-३ चा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार पडला, असे वैज्ञानिकांनी सांगितले. आता चंद्रयान-३ ची चंद्राच्या दिशेने आगेकूच होऊन चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला आहे. सर्व काही योग्य पद्धतीने झाले, तर २३ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.
Chandrayaan-3 Mission:
‘Thanks for the ride, mate! 👋’
said the Lander Module (LM).LM is successfully separated from the Propulsion Module (PM)
LM is set to descend to a slightly lower orbit upon a deboosting planned for tomorrow around 1600 Hrs., IST.
Now, 🇮🇳 has3⃣ 🛰️🛰️🛰️… pic.twitter.com/rJKkPSr6Ct
— ISRO (@isro) August 17, 2023
१. लँडरमध्ये असलेला ‘प्रज्ञान रोव्हर’ हा चंद्रावर पुढील १४ दिवस संशोधन करणार आहे. ‘लँडर’ म्हणजे यानाला बसवलेले यंत्र, जे नियोजित स्थळी उतरून त्याला नेमून दिलेले कार्य करते, तर चंद्रभूमीवर चालणारी बग्गी म्हणजे ‘रोव्हर’ होय.
२. इस्रोने सांगितले की, १८ ऑगस्टच्या सायंकाळी चंद्रयान-३ ला चंद्राच्या आणखी जवळ नेले जाईल. सध्या चंद्रयान-३ चे चंद्रापासूनचे अंतर १५३ किमी ते अधिकाधिक १६३ किमी आहे.
३. आता चंद्रयान-३ ला ‘डीबूस्ट’ केले जाईल, म्हणजे त्याचा वेग अल्प केला जाईल. यामुळे चंद्रयान-३ चे चंद्रापासूनचे अंतर न्यूनतम ३० किमी राहील.
४. चंद्रावर चंद्रयान-३ उतरवतांना या यानाला चंद्राला प्रदक्षिरणा घालता-घालता ९० कोनामध्ये फिरून चंद्राच्या दिशेने जाण्यास आरंभ करावा लागेल. प्रत्यक्ष ‘लँडिग’च्या वेळी चंद्रयान-३ ची गती १.६८ किमी प्रती सेकंड असेल. ‘थ्रस्टर’चा वापर करून या यानाला चंद्रभूमीवर सुरक्षितपणे उतरवले जाईल.
५. लँडरपासून वेगळे झालेले ‘प्रोपल्शन मोड्यूल’ काही आठवडे चंद्राला प्रदक्षिणा घालणार आहे. या कालावधीत हे ‘मोड्यूल’ पृथ्वीकडून चंद्राकडे येणार्या किरणांचा अभ्यास करणार आहे.