पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचे प्रकरण
वास्को, १६ ऑगस्ट (वार्ता.) – धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. धार्मिक स्थळाचा वापर २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करू नये, असे आवाहन वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी कुणाचेही नाव न घेता केले. चिखली चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो वास्को येथे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना हे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘धार्मिक तेढ निर्माण करणार्या विधानामुळे गोव्याचा धार्मिक सलोखा बिघडू शकतो. गोव्यात नेहमी धार्मिक सलोखा असतो.’’
मी प्रथम हिंदूच होतो !
मंत्री मावीन गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘मी पूर्वी एका मंदिरात धार्मिक कृत्य केल्यानंतर माझ्यावर टीका करण्यात आली होती. मी माझे मूळ विसरलेलो नाही. माझ्या पूर्वजांचे पोर्तुगिजांनी धर्मांतर करण्यापूर्वी आम्ही हिंदूच होतो आणि यामुळे मंदिरात पूजा केल्यास त्यात काय चूक आहे ?’’