‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !

धर्मांधांची झुंडशाही !

बदांयू (उत्तरप्रदेश) – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ या  चित्रपटाविषयी चर्चा करणार्‍या अमित गुप्ता नावाच्या हिंदु तरुणावर मुसलमान तरुणांनी येथे आक्रमण केले. या प्रकरणी अमित गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘१४ ऑगस्ट २०२३ या दिवशी मी माझ्या घराजवळ उभा होतो आणि ‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करत होतो. त्याचा राग येऊन तौसिफ आणि युसूफ यांनी मला शिवीगाळ करत मारहाण केली. मला मारत असल्याचे पाहून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. लोक येत असल्याचे पाहून तौसिफ आणि युसूफ पळून गेले.’’ या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.