
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने आगरा येथून पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चा हस्तक रवींद्र कुमार आणि त्याचा सहकारी यांना अटक केली. रवींद्र कुमार राज्यातील फिरोजाबाद येथील शस्त्रास्त्र कारखान्याचा अधिकारी आहे. तो आय.एस्.आय.साठी हेरगिरी करत होता आणि कारखान्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानात बसलेल्या महिला हस्तकाला पाठवत होता. या प्रकरणाची आतंकवादविरोधी पथक सखोल चौकशी करत आहे.
पाकमधील महिला हस्तकाने ‘नेहा शर्मा’ नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून रवींद्र याला अडकवले. पैशांच्या लोभापायी रवींद्र याने दैनंदिन उत्पादन अहवाल, स्क्रीनिंग कमिटीची गोपनीय पत्रे, ड्रोन आणि गगनयान प्रकल्पाशी संबंधित माहिती महिलेला पाठवली. रवींद्रच्या भ्रमणभाषमधून कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी, ५१ गोरखा रायफल्सचे अधिकारी आणि ड्रोनच्या चाचणीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याने व्हॉट्सॲपद्वारे गोपनीय माहितीदेखील पाठवली होती.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना भर चौकात सर्वांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे ! |