मिरज – सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि ‘नृत्यश्री चॅरिटेबल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मराठी अन् हिंदी भाषेतील काव्यांवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. याचे सादरीकरण ‘नृत्यश्री’च्या संचालिका आणि नर्तिका सौ. धनश्री आपटे अन् त्यांच्या २० शिष्या करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.