Nostradamus Predictions : भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर रशिया हिंदु धर्माचा स्वीकार करून जगात त्याचा प्रसार करील !

नॉस्ट्राडॅमस यांचे भाकीत !

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता मायकेल डी. नॉस्ट्राडॅमस

नवी देहली – फ्रान्सचे १५ व्या शतकातील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता मायकेल डी. नॉस्ट्राडॅमस यांनी वर्तवलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या ‘लेस प्रोफेटीज’ या पुस्तकात त्यांनी अनेक भाकिते वर्तवली होती, त्यांपैकी बहुतेक खरी ठरली आहेत. या पुस्तकातील भाकिते वेळोवेळी प्रसारमाध्यमांतून प्रकाशित होत असतात. भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्याविषयीचे त्यांचे भविष्य प्रकाशित झाले आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, जगातील एक मोठा देश साम्यवादाचा त्याग करून हिंदु धर्माचा स्वीकार करील आणि नंतर त्याचा प्रसार करील. हा मोठा देश म्हणजे रशिया असणार आहे; कारण साम्यवाद असणारा रशिया हाच सध्याचा मोठा देश असून त्याचे आणि भारताचे मैत्रीचे संबंध आहेत.

दक्षिण भारतातून उदयास येईल भारताचा हिंदु नेता !

नॉस्ट्राडॅमसच्या भाकितानुसार येणार्‍या काळात दक्षिण भारतातून एक हिंदु नेता उदयास येईल. हा नेता संपूर्ण जगाला एकत्र करेल. यानंतर रशिया साम्यवाद सोडून हिंदु धर्म स्वीकारेल. या काळात रशिया इतर देशांमध्येही हिंदु धर्माचा प्रचार करेल. २१ व्या शतकात भारत एक शक्तीशाली राष्ट्र्र म्हणून उदयास येईल आणि त्याचे आध्यात्मिक तत्वज्ञान (हिंदु धर्मासह) जगभर पसरू शकेल. हा भारतीय नेता जगाच्या राजकारणावर आणि अध्यात्मावर प्रभाव पाडेल.

सनातन संस्कृती आणि योग यांचा प्रसार !

नॉस्ट्राडॅमसने अशा वेळेचे संकेत दिले जेव्हा भारतीय संस्कृती, योग आणि वेदांत यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाईल. आज योग आणि ध्यान जगभरात लोकप्रिय झाले आहेत, ज्याला काही लोक त्याच्या भविष्यवाणीशी जोडतात.