आरोपीविरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही ! – नातेवाईकांचा आरोप

महिला कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – नेरूळ येथील एका रुग्णालयात महिला कर्मचार्‍याने गळफास घेत आत्महत्या केली होती; मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे ‘जोपर्यंत आरोपीविरोधात गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जरीना रेहमान शा असे मृत महिलेच नाव आहे. तिने १० सहस्र रुपयांची चोरी केल्याचा आरोप तेथील आधुनिक वैद्यांनी केला होता. याला तिच्या नातेवाईकांचा विरोध आहे.

महिला कर्मचार्‍यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. स्नेहा थडाणी यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.