आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !

प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाच्या विरोधातील गुन्हा रहित !

न्यायालयाने गुन्हा रहित केला, याचा अर्थ नोंदवलेला गुन्हा चुकीचा होता. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा रहित करण्यासह तो नोेंदवणार्‍या पोलिसांवर न्यायालयाने कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

गोवा : अबकारी घोटाळा प्रकरणी कारकुनासह २ निरीक्षक सेवेतून निलंबित

खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.

सिंधुदुर्ग : डिगस येथे बांगलादेशी नव्हे, तर बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील नागरिकांच्या अर्जांचा समावेश

बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?

(म्हणे) ‘कायदा-सुव्यवस्थेसाठी क्षमा मागितली; पण छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतलेला नाही !’ – कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा, गोवा

‘‘मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’ – सरपंच जोसेफ सिक्वेरा. अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नांदेड येथील गोरक्षकांवर झालेल्‍या आक्रमणाची एस्.आय.टी.च्‍या माध्‍यमातून कारवाई करा !

गोरक्षकांवरील आक्रमणाच्‍या चौकशीविषयी गोरक्षकांनाच सांगावे का लागते ? पोलीस स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ?

‘टीईटी’ प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणातील बीड जिल्‍ह्यातील ७६ उमेदवारांचे प्रमाणपत्र अवैध !

शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्‍यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हे नोंद करण्‍यात आले होते. या गुन्‍ह्यांच्‍या अन्‍वेेषणात हे ७६ शिक्षक अपप्रकार करून उत्तीर्ण झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.

एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्‍यात तडजोड झाल्‍याने मानहानीचा खटला मागे !

न्‍यायालयात मानहानीच्‍या दाव्‍यासंदर्भात सुनावणी पार पडली. ‘या खटल्‍यासंदर्भात दोघांमध्‍ये समजूत झाली असून दोघांच्‍या अपसमजेतून हा दावा प्रविष्‍ट झाला होता. याविषयी दोघांनी न्‍यायालयात लेखी दिले आहे. त्‍यानुसार आता हा दावा मागे घेण्‍यात आला आहे’,