जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ५ कोटी रुपयांचा मानहानीचा प्रविष्ट केलेला दावा २७ जून या दिवशी मागे घेतला आहे. दोघांकडून अपसमजातून हा प्रकार झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड, तसेच समझोता झाल्यानंतर दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला. हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे
काय आहे प्रकरण ?
वर्ष २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे मंत्री असतांना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याविषयी एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध ५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा प्रविष्ट केला होता. या प्रमुख हानीच्या खटल्यात २७ जून या दिवशी जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी होती. या वेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे दोन्हीही नेते उपस्थित होते. न्यायालयात मानहानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी पार पडली. ‘या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या अपसमजेतून हा दावा प्रविष्ट झाला होता. याविषयी दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला आहे’,