आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

मुंबई – महाराष्ट्रात २९ जून या दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आली आहे. कोट्यवधी वारकरी आणि वैष्णव भक्त हे अत्यंत श्रद्धेने उपवास अन् व्रत धरून आषाढी एकादशी साजरी करतात. कोट्यवधी हिंदूंकडून विशेषत: आहार-विहाराचे पावित्र्य जपले जाते; मात्र याच दिवशी बकरी ईद असल्यामुळे गोवंशियांंची मोठ्या प्रमाणात हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर कार्यवाही करून गोवंशियांची हत्या रोखावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे अन्य पशूंची हत्या होऊन प्रदूषण होऊ नये; म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी पोलीस, तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. बकरी ईदच्या निमित्ताने प्राण्यांची अवैधरित्या हत्या केल्यावर अनेक ठिकाणी त्यांचे रक्त, मांस, तसेच अन्य दुर्गंधीयुक्त पदार्थ योग्य प्रक्रिया न करता रस्त्यावर आणि गटारात टाकले जातात. त्यामुळे प्रदूषण तर वाढतेच; पण पावसाळा असल्याने रोगराई वाढण्याचीही शक्यता आहे.

२. हिंदु धर्मानुसार गायीला माता आणि देवता स्वरूपात पुजले जाते, हे काही मुसलमान जाणतात. तरीही ते जाणीवपूर्वक गोमातेची हत्या करतात. यातून त्यांचा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू स्पष्ट होतो.

३. राज्यात गोवंशियांच्या हत्येच्या विरोधात कायदा केला असला, तरी छुप्या पद्धतीने गोवंशियांची हत्या करण्यात येत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात.

४. देशभरात हिंदु धर्मियांना प्रशासनाकडून प्रतीवर्षी ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’, ‘इको फ्रेंडली होळी’, ‘इको फ्रेंडली दिवाळी’ साजरा करण्याचे आवाहन केले जाते. त्याच पद्धतीने प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होऊ नये; म्हणून प्रशासनाने मुसलमान समुदायाला ‘इको फ्रेंडली बकरी ईद’ साजरी करण्याविषयी प्रबोधन करावे.

५. अधिकृत पशूवधगृहाच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही प्राण्यांची कत्तल करणे अवैध आहे. त्यामुळे एक दिवसाचे तात्पुरते पशूवधगृह उभारण्याची अनुमती देऊ नये. गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने गोरक्षकांचे साहाय्य घ्यावे.

६. प्रशासनाने सतर्क राहून गोहत्या करणार्‍या व्यक्ती आणि ठिकाण यांची नावे गोळा करून तेथे शासनाने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.


हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदन आणि त्याची पोच –


अमरावती येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित धर्मप्रेमी

अमरावती – येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवासी जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने महानगरपालिका आणि पोलीस यांना याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना पाठवणार असल्याचे सांगितले. या वेळी अरुणभाऊ पडोळे, भारतीय सिंधु सभेचे प्रकाश सिरवानी, भाजप व्यापारी आघाडीचे आत्माराम पुरसवानी, गोरक्षा दलाचे अजितपाल मोंगा, बजरंग दलाचे संतोष गहरवार, हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, आनंद डाऊ, प्रदीप गर्गे उपस्थित होते.

धुळे येथील पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील धर्मप्रेमींशी चर्चा करतांना
धुळे येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
धुळे येथील नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय.जी.पी.) डॉ. शेखर पाटील धर्मप्रेमींशी चर्चा करतांना

धुळे – येथील नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय.जी.पी.) डॉ. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, गोप्रेमी, गोरक्षक, अधिवक्ते उपस्थित होते. या वेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आय.जी.पी) जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांनी प्रशासनाने केलेले नियोजन, तसेच केलेली कारवाई याविषयी सांगितले, तसेच २९ जूनलाही कायदेशीर दृष्टीने कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

तळोदा येथील तहसीलदार गिरीश वखारे यांनी निवेदन घेतले

तळोदा (जिल्हा नंदुरबार) – येथील तहसीलदार गिरीश वखारे आणि पोलीस निरीक्षक अमित बागुल यांना निवेदन देतांना कु. भावना कदम, श्री. मयुर ढोले, श्री. गिरीश खैरनार, श्री. रोहित सूर्यवंशी, श्री. सौरभ कलाल, श्री. रूपेश शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे उपस्थित होते.

निवेदन स्वीकारतांना नंदुरबार येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे साहेब

नंदुरबार – येथे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री जितेंद्र मराठे, आकाश गावित, खंडू माळी, राकेश केणे, हर्षल देसाई आणि सतीश बागुल उपस्थित होते.

निवेदन घेतांना दोंडाईचा (धुळे) येथील तहसीलदार गांगुर्डे मॅडम

दोंडाईचा (जिल्हा धुळे) – येथील तहसीलदार गांगुर्डे मॅडम आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनाही निवेदन देण्यात आले.

संपादकीय  भूमिका 

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !