हिंदु शिक्षिकांनी २ मुसलमान विद्यार्थिनींचा हिजाब उतरवण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष !

  • भाग्यनगर (तेलंगाणा) येथील घटना !

  • प्राचार्या आणि शिक्षिका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील हयातनगरच्या एका शाळेतील प्राचार्या आणि शिक्षिका यांनी दहावी इयत्तेत शिकणार्‍या दोन मुसलमान विद्यार्थिनींनी घातलेला हिजाब काढण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात आणि या विद्यार्थिनींमध्ये संघर्ष झाला. २३ जून या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी प्राचार्या पूर्णादेवी श्रीवास्तव आणि ३ शिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


२३ जून या दिवशी एका तासाच्या वेळी शिक्षिकेने दोन्ही मुसलमान विद्यार्थिनींना ‘तुम्ही शाळेत हिजाब घालण्याची अनुमती मिळवली आहे का ?’, असे विचारले. जेव्हा अन्य एका शिक्षिकेने मुलींचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका विद्यार्थिनीने त्याला विरोध केला आणि तिच्या आई-वडिलांशी यासंदर्भात बोलण्यास सांगितले. कालांतराने प्राचार्या श्रीवास्तव यांनी संबंधित विद्यार्थिनींना ‘धर्म शाळेच्या बाहेर ठेवायला हवा’, अशा शब्दांत सुनावले. शाळा धर्मनिरपेक्ष असल्याने ख्रिस्ती विद्यार्थ्यांनाही क्रॉस घालण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. मुसलमान शिक्षिकाही बुर्का काढूनच शाळेत प्रवेश करतात. त्यानंतर प्राचार्या श्रीवास्तव यांनी बलपूर्वक या विद्यार्थिनींचा हिजाब उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला.

संपादकीय भूमिका

  • ‘स्वत:च्या शिक्षकांशी संघर्ष करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींमध्ये एवढा उन्माद जिहादी विचारसरणीतून येतो’, असे म्हटल्यास चूक ते काय ?
  • शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याच्या विविध सरकारांच्या प्रयत्नांवर शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप करणारे आता अशा घटनांमधून शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे, असे का म्हणत नाहीत ?
  • स्वधर्मातील श्रेष्ठ परंपरांवर हसणारे हिंदू यातून बोध घेतील का ?