पुणे – आयटी कंपन्यांसह रात्री घरी परतणार्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील आयटी कंपन्यांचा परिसर, बसस्थानक आणि प्रमुख चौकांमध्ये २३ जूनपासून विशेष सुरक्षा अभियान चालू केले आहे. यामुळे शहरात नाकाबंदी आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर येथील बसस्थानके आणि रेल्वेस्थानकावर महिला पोलीस कर्मचार्यांचे विशेष पथक नेमले आहे. हे पोलीस पथक रात्रभर तैनात असेल, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.