हिंदुविरोधी ‘नेरेटिव्ह’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदुत्वनिष्ठांना विभाजीत करण्याचे हे षंड्यंत्र आहे. अधिवक्ता एक योद्वा आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी ठामपणे उभे राहिल्यास हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांचा आत्मविश्‍वास वाढतो.

हिंदु संस्कृतीवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी अधिवक्त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करावा ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय, देहली

स्वातंत्र्यापूर्वी भारतात न्यायालयीन कामकाजात वेद-शास्त्रे यांचा संदर्भ अभ्यासला आणि दिला जात होता; परंतु आता कायद्यांच्या पाश्‍चात्त्यीकरणामुळे तेथील संदर्भांचा वापर केला जात आहे.

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

‘औ’ या अक्षराची ओळख ‘औरंगजेब’ अशी होणे, हे औरंगजेबाचा खरा क्रूरतेने भरलेला इतिहास न शिकवल्याचा परिणाम !

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेसाठी नोंदणी रहित झालेल्या संस्थेला ठेका !

या संस्थेसह ठेका प्रक्रियेत सहभागी असलेले नगरपंचायतीतील संबंधित अधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी वरिष्ठ स्तरावर करणार – भाजपचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर

रूमडामळ (मडगाव – गोवा) येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

अन्य राज्यांप्रमाणे आता गोव्यातही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत. धर्मांध वरचढ होण्यापूर्वीच हिंदूंनी यावर संघटितपणे उपाययोजना काढायला हवी !

(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी

प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?

गोवा : क्रांतीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांत क्रांतीलढ्याचा इतिहास, कुंकळ्ळीवासियांचा लढा, इन्क्विझिशनचा भयानक इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत न होणे दुर्दैवी ! स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ झाल्याचे म्हटले, ते योग्यच होते !

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून मजारीचे दर्शन घेतले !

मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही. औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का ?

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त !

सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे.

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.