रूमडामळ (मडगाव – गोवा) येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

  • संशयित आयुब खान पोलिसांच्या कह्यात

  • अनधिकृत मदरशाला आक्षेप घेतल्यावरून आक्रमण झाल्याचा संशय

पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

मडगाव, १८ जून (वार्ता.) – रूमडामळ, दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर १७ जूनच्या रात्री प्राणघातक आक्रमण करण्यात आले. मायणा कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आयुब खान याला कह्यात घेतले आहे. रूमडामळ येथील अनधिकृत मदरशाच्या प्रकरणावरून आक्रमण झाल्याचा संयश व्यक्त केला जात आहे.

घटनेविषयी पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते १७ जूनच्या रात्री अंदाजे १०.३० वाजता त्यांच्या वाहनातून घरी जात होते. मध्येच ते फोन घेण्यासाठी थांबले असता कपड्याने तोंड बांधलेल्या एका व्यक्तीने जड वस्तूने त्यांच्या गाडीची काच फोडून नंतर त्यांच्यावर चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र पंचसदस्य वळवईकर प्रसंगावधान राखून बाजूला सरकले. यामुळे चाकू वाहनाच्या सीटमध्ये घुसला. यानंतर मारेकरी पळून गेला. मारेकर्‍याचा शोध घेणे चालू आहे. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आक्रमण पूर्वनियोजित ! – पंचसदस्य वळवईकर

हे आक्रमण पूर्वनियोजित होते, असा दावा पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या ग्रामसभेत पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी या भागात चालू असलेल्या एका अनधिकृत मदरशाचा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी पंचसदस्य वळवईकर आणि त्यांचे समर्थक, तसेच मदरशाला समर्थन करणारा गट यांच्यामध्ये वाद झाला होता. यानंतर पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी गृहनिर्माण वसाहत परिसरात हिंदु धर्मियांचे शुभेच्छा फलक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फलक लावले होते. यानंतर अज्ञातांनी या फलकांची नासधूस केली होती. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट झालेली आहे. याच कारणामुळे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आक्रमण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. सावंत

पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर झालेले आक्रमण ही घटना गंभीर आहे. या प्रकरणाचा मी अहवाल घेतला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्रांतीदिन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलतांना दिली.

संपादकीय भूमिका

अन्य राज्यांप्रमाणे आता गोव्यातही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत. धर्मांध वरचढ होण्यापूर्वीच हिंदूंनी यावर संघटितपणे उपाययोजना काढायला हवी !