प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून मजारीचे दर्शन घेतले !

औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून मजारीचे दर्शन घेताना मध्यभागी प्रकाश आंबेडकर आणि अन्य सहकारी

छत्रपती संभाजीनगर – गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर औरंगजेबाच्या संदर्भात पोस्ट आणि स्टेटस ठेवण्यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत तणाव निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दंगलीही घडल्या. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर १७ जून या दिवशी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या मजारीला फुले वाहून त्यासमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुति मंदिरातही दर्शन घेतले.

मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही. औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का ? औरंगजेबाचे राज्य का आले ? हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. जयचंद येथे आले आणि राज्या-राज्यांत झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगजेबाला शिव्या कशाला घालता ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.