समान नागरी कायद्यावरून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांना पोटशूळ !
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)
नवी देहली – ‘आम्ही समान नागरी कायद्याला विरोध करू; मात्र रस्त्यावर उतरणार नाही. या कायद्याचा हेतू हा हिंदू-मुसलमानांमध्ये दरी निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा आहे. ‘कोणत्याही सरकारने घातला नाही, असा घाव विद्यमान सरकार मुसलमानांवर घालत आहे’, असे विधान करून ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी गरळओक केली. केंद्रशासनाने समान नागरी कायद्याच्या संदर्भात नुकतीच जनतेची मते मागवल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
‘आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही’; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने…#ArshadMadanihttps://t.co/2Twb1V1hG6
— Lokmat (@lokmat) June 18, 2023
मदनी पुढे म्हणाले, ‘‘समान नागरी कायद्याच्या सूत्रावर आम्ही रस्त्यावर उतरणार नाही; कारण आम्ही तसे केले, तर आमच्या विरोधात असणार्या लोकांचा जो हेतू आहे, तो साध्य होईल. असे होऊ देण्याची आमची इच्छा नाही. (एरव्ही मुसलमानांच्या विरोधात खुट्ट झाले, तरी त्यांना चिथावणार्या मदनी यांच्या या वक्तव्यावर एखादे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ? – संपादक) ही सरकारची राजकीय खेळी असून यात काहीही तथ्य नाही, असे राजकीय पक्षही मानत आहेत.’’
संपादकीय भूमिकाप्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ? |