हिंदुविरोधी ‘नेरेटिव्ह’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ तृतीय दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणातील कथित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह अटकेत असतांना त्यांच्यावर एका मुसलमान महिलेने कारागृहात आक्रमण केले. खटल्याची सुनावणीच्या वेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या निर्दोषत्वाविषयी सांगतांना एका भाविकाचा सुनावणीच्या वेळी न्यायालयात मृत्यू झाला. ही वृत्ते कुठेच प्रसिद्ध झाली नाहीत. मालेगाव बाँबस्फोटातील आरोपींची सुटका झाल्यानंतर ‘हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने कसे षड्यंत्र रचले’, याविषयी वर्ष २०१२ मध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले नाही. याउलट हिंदुत्वनिष्ठांना बाँबस्फोट केल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अशा प्रकारे हिंदुविरोधी ‘नेरेटिव्ह’ (कथानक) पसरवले जात आहे. त्याच्या विरोधात आपणाला एकत्रित लढायला हवे. हिंदुत्वनिष्ठांना विभाजीत करण्याचे हे षंड्यंत्र आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेकडून हिंदुत्वनिष्ठांचे खटले विनामूल्य लढवले जात आहेत, याचा मला अभिमान आहे. अनेक अधिवक्ता या कार्यात जोडले जात आहेत. अशा प्रकारे विनाशुल्क काम करणे सोपे नाही. अधिवक्ता एक योद्वा आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी ठामपणे उभे राहिल्यास हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांचा आत्मविश्‍वास वाढतो. कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश येथे हिंदुत्वासाठी कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता सिद्ध झाले आहेत. हिंदुत्वाच्या समान विचारधारेने आपणाला पुढे जायला हवे. हे कार्य करतांना आपणाला घाबरण्याचे कारण नाही; कारण आपल्या पाठीशी भगवंत आहे, असे वक्तव्य हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी केले.