स्वातंत्र्यालढ्यातील क्रांतीवीरांचे लंडन येथील स्थान असलेल्या ‘इंडिया हाऊस’वर बनणार चित्रपट !

प्रसिद्ध अभिनेते राम चरण आणि ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे ‘इंडिया हाऊस’ या नावाचा चित्रपट बनवणार आहेत. राम चरण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही घोषणा केली.

अमेरिका लाखो भारतीय वंशाच्या तरुणांना देशातून हाकलू शकते !

अमेरिकेतील अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’चे भविष्य धोक्यात आले असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. या ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’मध्ये बहुतेक मूळ भारतीय वंशाचे आहेत.

वीर सावरकर यांचा त्याग, साहस आणि संकल्प शक्ती यांची गाथा आजही प्रेरणा देते ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

२८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले.

जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंचा नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

गेल्या मासाभरापासून काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने त्यांनी २८ मे या दिवशी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत.

गोवा : मागील ९ वर्षे प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराची शिकार

ही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक !

गोव्यात गेल्या ४ मासांत तब्बल ७३ अमली पदार्थ तस्करांना अटक, तरीही व्यवहार चालूच !

अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण आणि अमली पदार्थ उपलब्ध होऊ शकत असलेल्या परिसरात अचानक तपासणी केल्याचा दावा सरकार करत असले, तरी राज्यात संबंधित मृत्यू आणि व्यवहार चालूच !

केंद्रशासनाकडून म्हादई प्रवाह प्राधिकरण अधिसूचित

म्हादई प्रवाह प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन योजना २०२३ सिद्ध करण्यात आली आहे. ही योजना २२ मे २०२३ या दिवशी अधिसूचित करण्यात आली आहे. आता म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्याविरुद्धच्या लढ्यामध्ये गोव्याला प्राधिकरणाचे साहाय्य मिळेल, ही आशा !

यवतमाळ येथील संघटित गुन्हेगारीत माजी नगरसेवक पिता-पुत्र तडीपार !

अवैध व्यवसाय, दहशत निर्माण करणे, गुंडागर्दी, सामाजिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत.

देशप्रेम म्हणजे सावरकर !

‘इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेतले जाते. बाकी कुणाचेच घेतले जात नाही.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले