घराच्या वाटणीच्या वादामुळे वृद्ध व्यक्तीची हत्या !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – फलटण तालुक्यातील सालपे येथील रहिवासी सावता सरस्वती काळे (वय ७५ वर्षे) यांची त्यांच्या नातवंडांनीच डोक्यात कुराड घालून हत्या केली आहे. घराच्या वाटणीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तक्रारदार मिथुन काळे यांचे आजोबा सावता काळे यांची मिथुन यांचे सावत्र भाऊ दत्ता काळे, महेश काळे आणि दत्ता काळे यांचे सासरे अमित शिंदे यांनी संगणमत करून ३० डिसेंबर या दिवशी सावता काळे यांची हत्या केली. दोघांनी सावता काळे यांना धरून तिसर्‍याने डोक्यात कुर्‍हाड घातली, तसेच एकाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन सावता काळे मृत्यूमुखी पडले. संशयित दत्ता काळे आणि महेश काळे यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून अमित शिंदे यांचा शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका :

माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! पैशांसाठी वृद्ध व्यक्तीची हत्या करणारी जनता निर्माण होणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम !