स्वातंत्र्यालढ्यातील क्रांतीवीरांचे लंडन येथील स्थान असलेल्या ‘इंडिया हाऊस’वर बनणार चित्रपट !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी अभिनेता राम चरण यांनी केली  घोषणा !

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते राम चरण आणि ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे ‘इंडिया हाऊस’ या नावाचा चित्रपट बनवणार आहेत. राम चरण यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही घोषणा केली. हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. लंडन येथील ‘इंडिया हाऊस’ची स्थापना करणारे भारताचे स्वातंत्र्यसैनिक शामजी कृष्ण वर्मा यांचे जीवनचरित्र यात मांडण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे शामजी कृष्ण वर्मा यांची भूमिका साकारणार आहेत. इंडिया हाऊस हे ठिकाणी क्रांतीकारकांचे प्रमुख स्थान होते. येथेच स्वातंत्र्यवीर सावरकरही रहात होते.