जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंचा नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

नवी देहली – गेल्या मासाभरापासून काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने त्यांनी २८ मे या दिवशी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला. पोलिसांनी या कुस्तीपटूंना कह्यात घेतले. त्यामुळे येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. नव्या संसद भवनाजवळ महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीचे नेतृत्व महिलांकडून करण्यात येणार होते.