सोलापूर रेल्वे विभागाची ७ कोटी रुपयांची दंड वसुली !

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत तिकीट पडताळणीच्या कालावधीत १ लाख ६१ सहस्र ११४ प्रवासी विनातिकीट प्रवास करतांना आढळले. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ कोटी ७७ लाख १७ सहस्र ७८५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या साहाय्याने करण्यात आली.

प्रवासी रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने चालू रहाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

  • आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा दुष्परिणाम !
  • फुकट रेल्वे प्रवास करणार्‍यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत समस्या कशी सुटेल ?