पुणे – २०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला आरंभ झाला आहे. काही जणांनी नववर्षाचा प्रारंभ देवदर्शनाने करण्याच्या उद्देशाने राज्यातील तीर्थस्थळी जाणे पसंत केले. यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, शिर्डीचे साईबाबा या मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली आहे, तसेच विठुरायाला ५ सहस्र संत्र्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुणे येथील भाविक प्रदीप सिंह ठाकुर यांच्या वतीने विठ्ठल मंदिरातील गाभार्यात संत्र्यांची आणि पानाफुलांची आरास केली होती.