पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून गोव्यात सरासरी २ दिवसांतून एकदा एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले आहे. या काळात गोवा पोलिसांनी १० कोटी रुपये किमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून १८८ जणांना कह्यात घेतले. या १८८ पैकी ५४ जण गोव्यातील, १११ जण गोव्याबाहेरील आणि २३ जण विदेशी नागरिक आहेत
वर्ष २०२४ मध्ये पोलिसांनी गोव्यात प्रथमच ‘डेट रेप ड्रग’ (गामा-हॉड्राक्सीब्यूटीरेट) हे अमली पदार्थ कह्यात घेतले. याचा बाजारभाव १२ लाख रुपये होता. त्याचप्रमाणे पोलिसांनी ‘कॅनबीस’ या अमली पदार्थाची लागवड करणार्या बोरी आणि पाळे येथील प्रयोगशाळा उद्ध्वस्त केल्या.