अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !

यामागे कुणाचा हात आहे ? याची प्रशासनाने सखोल चौकशी करावी ! – कुणाल भंडारी, बजरंग दल

प्रतिकात्मक चित्र

अहिल्यानगर – पिंपळगाव माळवी येथील अशोक कदम, राजेश प्रभुणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून साळवे कुटुंबाला मागील ६ महिन्यांपासून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रार्थनेच्या नावाखाली वैद्यकीय साहाय्य देऊन, तसेच शाळेतून हिंदूंना धर्म परिवर्तनासाठी बळजोरी करण्यात येते. अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू आहे. यामागे कुणाचा हात आहे याची चौकशी करावी, तसेच खोटे गुन्हे नोंद करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिली आहे, हिंदु जेव्हा पोलीस ठाण्यात या विरोधात आवाज उठवण्यासाठी जातात, तेव्हा त्यांची नोंद घेतली जात नाही, असेही कुणाल भंडारी यांचे म्हणणे आहे.

२५ डिसेंबर या दिवशी पिंपळगाव माळवी येथे अजून एक धर्मपरिवर्तनाची घटना घडली आहे. साळवे कुटुंबाने धर्मपरिवर्तनाला विरोध केला; म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी अनेक वेळेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला धर्मपरिवर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी याविषयीचे निवेदन दिले आहे. (प्रशासनाला निवेदन देऊनही काही का केले नाही ? याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !