पणजी, २७ मे (वार्ता.) – मागील ९ वर्षे सरासरी प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराला बळी पडल्या आहेत. पीडितांवर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले. राज्य सरकारच्या पीडित साहाय्य केंद्राच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या केंद्राने वर्ष २०१४ पासून अत्याचाराची एकूण २ सहस्र ७३४ प्रकरणे हाताळली आहेत आणि यामधील ७० टक्के प्रकरणे ही महिलांशी निगडित आहेत, तसेच अहवालानुसार पीडित मुलांपैकी निम्मी मुले ही १५ वर्षे किंवा त्याहून अल्प वयोगटातील आहेत. हा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना गत आठवड्यात सुपुर्द करण्यात आला आहे.
Every week, 5 women & kids are victims of crimes in #Goa
Over the past nine years, an average of five women and children become victims of crimes every week, according to a report by the state government’s victim assistance unit (VAU).https://t.co/dlshkILmiI pic.twitter.com/FlS0t9WIwT
— The Times Of India (@timesofindia) May 26, 2023
अहवालानुसार पोलीस ठाणेनिहाय प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत. म्हापसा (२२.४ टक्के), पणजी (११.५ टक्के), जुने गोवे (७.३ टक्के), महिला पोलीस ठाणे (७.१ टक्के) आणि पर्वरी (६.५ टक्के). पीडित साहाय्य केंद्राने या कालावधीत लैंगिक अत्याचार, साहाय्यता करणे, ट्रोमा काऊंसिलिंग, सामाजिक आणि कायदेशीर साहाय्य करणे, घरगुती हिंसा आणि समूपदेशन यांद्वारे ही प्रकरणे हाताळली आहेत.
संपादकीय भूमिकाही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक ! |