दोडामार्ग – गेल्या काही दिवसांपासून गिरोडा गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. हा बिबट्या लोकवस्ती, तसेच गुरांच्या गोठ्याजवळ येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्या लोकवस्तीत येत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. गुरांच्या गोठ्याच्या जवळ बिबट्या येत असल्याने गुरे बाहेर चरायला सोडली, तर बिबट्या आक्रमण करू शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग वन विभागाच्या कर्मचार्यांनी गावात येऊन लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्याच्या उमटलेल्या पावलांचे छायाचित्र काढले, तसेच परिसरात पहाणी केली. काही दिवसांपूर्वी कसई, दोडामार्ग या भागात २ बिबटे आढळून आले होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नाधवडे येथे घरावर बिबट्या बसल्याचा व्हिडिओ प्रसारित
वैभववाडी – तालुक्यातील नाधवडे येथे एका घराचे बांधकाम चालू आहे. त्या घराच्या वरच्या मजल्यावर बिबट्या बसल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्येही भीतीते वातावरण निर्माण झाले आहे.
संपादकीय भूमिकाबिबट्यांची समस्या सुटण्यासाठी सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन तत्परतेने उपाययोजना का काढत नाही ? |